Thursday, August 30, 2007
वारीला रवाना
पंढरपूरची वारी आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल किंवा नसेल. मी मात्र आयुष्यामध्ये पहिल्यांदाच या वारीचा अनुभव घेतला आणि तोही काम करता. स्टार न्यूजचा नवीन मराठी चॅनल "स्टार माझा" सुरू झाला. नवीन चॅनलसाठी वारी कव्हर करावी असं माझ्या मनात आधीपासून होतं. वरिष्ठांना तसं बोलूनही दाखवलं नंतर विसरुन गेलो. ऑफ असल्यानं दुपारी झोपलो होतो अचानक वरिष्ठांचा कॉल आला तुला वारीला जायचंय. संध्याकाळपर्यंत मला वाटत होतं की मला काही दिवसांनंतर निघायचंय मात्र नंतर कळलं की दुसऱ्याच दिवशी निघायचंय. घाईगडबडीत सगळं आवरलं आणि दुसऱ्या दिवसासाठी तयार झालो. धीरज कातकडे आणि संदीप पवार ही जोडी माझ्याबरोबर वारीला रवाना झाली होती. या दोघांबद्दल मला फारशी माहिती नव्हती, कारण चॅनलमध्ये येऊनच मला काही महिने झाले होते. धीरज बराच गंभीर स्वभावाचा आहे आणि संदीप बराच उपदव्यापी स्वरुपाचा. धीरज संदीपचा बॉस, संदीप नेहमी त्याला शिव्या देण्यासाठी कारण तयार करायचा. या दोघांबरोबर जवळपास महिनाभर काढायचा होता।
Subscribe to:
Posts (Atom)